Driving License Test Online 2023

याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स कसे अप्लाय करायचे ते सविस्तर सांगितलेले आहे. त्याची लिंक 👇👇

Learning License Application

आता आपण या ब्लॉगमध्ये Driving License साठीची Exam असते ती घरी बसून कशी देतात त्याची सविस्तर माहिती पाहू.

सुरुवातीला आपल्याला parivahan.gov.in या वेबसाईटवर यायचे आहे.

  • Drivers/Learnees License याला click करा. याच्यानंतर तुम्ही ज्या राज्यातील असाल ते राज्य निवडायचे आहे. तुम्ही आता राज्याच्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट या पेजवर येतात.

याच्यामध्ये तुम्हाला Learner Licence या ऑप्शनवर यायचे आहे व त्याच्यामध्ये असणाऱ्या ऑप्शन्स मधून आपण Online LL Test (stall)
या ऑप्शनला Click करा.

आपण मागच्या ब्लॉग मध्ये दिल्याप्रमाणे आपण एप्लीकेशन दिले होते त्याच्यामध्ये आपल्याला मिळालेला Application Number या ठिकाणी टाका. व त्याच्याखाली असलेला कॅपच्या टाका व Submit वर क्लिक करा. त्याच्यानंतर खालच्या बाजूला तुमची Date of Birth टाकून घ्या. पुढे आपल्याला Password टाकण्यास सांगितला जातो. त्या ठिकाणी तुमच्या फोनवर पासवर्ड परिवहन ऑफिस कडून आलेला असतो नसेल आला तर तुम्ही Resend Password करून पासवर्ड टाका. आता तुम्ही ही परीक्षा ऑनलाईन देणार आहात त्याच्यामुळे तुमच्या लॅपटॉपचा कॉम्प्युटरचा किंवा फोनचा कॅमेरा हा व्यवस्थित चालला पाहिजे . आता पुढे Proceed याच्यावर क्लिक करावे.

Driving License – : आता तुमच्यापुढे Screen Test Aid For Learner Licence

या टेस्टमध्ये तुम्हाला ट्राफिक रोल आणि ट्राफिक सिग्नल याच्याबद्दल काही प्रश्न विचारले जातील. तुम्हाला या ठिकाणी एकूण 50 प्रश्न विचारले जातील त्याच्यामध्ये Minimum 9 प्रश्नांची उत्तरे बरोबर येन अपेक्षित आहे म्हणजे तुम्ही पास होतात. आता तुम्ही Continue ला क्लिक करा.

पुढे तुम्हाला तुमचा फोटो आपले कट नेम एप्लीकेशन नंबर डेट ऑफ बर्थ हे सर्व दिसेल. आता तुम्हाला परीक्षा कोणत्या भाषेत द्यायची आहे ती भाषा निवडायची आहे. आणि पुढे इंटर पिन या ठिकाणी तुम्ही तुमचा पिन नंबर टाकून घ्यायचा आहे शहराचा. याच्यानंतर खालच्या प्रमाण कंडिशन आहे ॲग्री याला क्लिक करून घ्यायचा आहे. व Continue ला क्लिक करा.

याच्यानंतर Face Authentication होईल याच्यामध्ये ज्या चा पेपर आहे त्यानेच कॅमेरे समोर Test देण्यासाठी यायचे आहे. ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर तुमच्यासमोर टेस्ट मधील प्रश्न यायला सुरुवात होते हातात तुम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तरे द्यायचे आहेत. जो पर्याय तुम्ही निवडल त्याच्यानंतर कन्फर्म याच्यावर क्लिक करावे. म्हणजे तुम्हाला तुमचे उत्तर बरोबर आहे की चूक ते लगेच समजेल. जर ग्रीन कलर आला तर तुमचे उत्तर बरोबर आहे व जर रेड कलर आला तर तुमचे उत्तर चूक आहे.

Driving License

मित्रांनो टेस्ट देत असताना ज्या पण ठिकाणी तुमचे 9 प्रश्नांची उत्तरे बरोबर येतील त्या ठिकाणी तुमची टेस्ट संपेल व तुम्ही पास व्हाल.

तुम्ही पास झालात की पुढील पेजवर तुमचा Learner Licence Number येतो. Click hear to Print your Learner Licence याला क्लिक करा. पुढे तुम्हाला तुमच्या फोनवर एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी टाकून घ्यायचा आहे व सबमिट याला क्लिक करा.

तुमचं लर्निंग लायसन जनरेट झालेला आहे तुमचे अभिनंदन. आता याची पीडीएफ कॉपी तुम्ही सेव्ह करून ठेवा म्हणजे तुम्ही तुमची प्रिंट काढू शकतात.

आता तुम्ही याच्या मार्फत तुमचे ड्रायव्हिंग लायसन बनवू शकता याची माहिती मी पुढील ब्लॉगमध्ये तुम्हाला देईल धन्यवाद

Leave a comment

error: