Dharashiv pik vima 2023 | धाराशिव पिक विमा

Dharashiv pik vima 2023 – : पिक विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालया ने याच्या अगोदर अधिसूचना काढली होती.परंतु बरीचशी महसूल मंडळे यांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. जी महसूल मंडळे पहिल्या जाहीर केलेल्या अधिसूचनेमध्ये नव्हती त्या ठिकाणी देखील मागील 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड होता. परंतु ही महसूल मंडळे पिक विमा भरपाई पासून वंचित राहिली होती त्या संदर्भात आता आपण सविस्तर बातमी पाहूया

धाराशिव जिल्ह्यातील दोन तालुके आणि जी महसूल मंडळी राहिली होती व त्यांचे 50 टक्के पेक्षा जास्त प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्या उर्वरित महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे. अशी महसूल मंडळे खालील प्रमाणे आहेत.

खालील सर्व महसूल मंडळांचा सोयाबीन या पिकासाठी समावेश करण्यात आलेला आहे याची नोंद घ्यावी.

सोयाबीन या पिकासाठी नळदुर्ग या महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे.

उमरगा तालुक्यातील नारंगवाडी या महसूल मंडळाचा समावेश करण्यात आलेला आहे.

कळंब तालुक्यातील खालील महसूल मंडळाचा समावेश करण्यात आलेला आहे.

कळंब , ईटकुर, मोहा आणि गोविंदपूर या महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे.

वाशी तालुक्यातील (हा तालुका देखील मागील जाहीर केलेल्या अधिसूचनेमधून वळविण्यात आला होता)

वाशी ,तेरखेड या महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे.

भूम तालुक्यातील सर्वच महसूल मंडळांचा अधिसूचनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

आंबी ,पाथरूड, माणकेश्वर ,आष्टा ,भुम ,वालवण या सर्व महसूल मंडळांचा समावेश अधिसूचनेत करण्यात आलेला आहे.

परंडा तालुक्यातील महसूल मंडळे ( या तालुक्यातील काही महसूल मंडळे पहिल्या आधी सूचनेमधून वगळण्यात आली होती.)

आसू ,जवळा आणि पाचपिपळा या सर्व महसूल मंडळाच्या समावेश करण्यात आलेला आहे.
( जवळा या महसूल मंडळामध्ये सर्वात जास्त पिकांचे नुकसान झालेले आहे. आता ह्या नवीन जाहीर केलेल्या अधिसूचनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे)

Dharashiv pik vima 2023

Dharashiv pik vima 2023 – : धाराशिव जिल्ह्यातील वरील सर्व महसूल मंडळे यांच्या अगोदरच्या अधिसूचनेतून वगळण्यात आली होती. त्यामुळे तेथे असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मते आमच्या भागात भरपूर प्रमाणात नुकसान झाले असताना देखील या महसूल मंडळांचा समावेश का केला नव्हता असा प्रश्न मोठ्या प्रमाणात विचारला जात होता. या विचारल्या गेलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या हेतूने शासनाने किती प्रमाणात नुकसान झाले आहे हे परत एकदा पाहून या ठिकाणी वगळण्यात आलेल्या सर्व व नुकसान ग्रस्त असलेल्या सर्व महसूल मंडळांचा समावेश नवीन अधिसूचनेमध्ये केलेला आहे. त्यामुळे तिथे असलेल्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Dharashiv pik vima 2023 – : जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आधी सूचना निघाल्यापासून एका महिन्याच्या आत पिक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणे अपेक्षित आहे.

पुढील एका महिन्यात च्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील.( साधारणपणे 10 ऑक्टोंबर च्या दरम्यान पिक विमा रक्कम खात्यात जमा होईल)

धाराशिव जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळाची माहिती पाहण्यासाठी याला क्लिक करा.

धाराशिव जिल्ह्यामध्ये काढण्यात आलेल्या अधिसूचने मध्ये समाविष्ट नसलेल्या दोन तालुक्यातील व नुकसानग्रस्त असलेल्या इतर काही तालुक्यातील समाविष्ट न केलेल्या महसूल मंडळांना नवीन जाहीर केलेल्या अधिसूचनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. धन्यवाद Dharashiv pik vima 2023

Leave a comment

error: