Compensation Grant 2023 | नुकसान भरपाई अनुदान

निसर्गाच्या वि|विध प्रकारच्या आपत्तीमुळे ज्याच्यामध्ये सततच्या पावसामुळे होणारे नुकसान असेल ,अतिवृष्टी असेल, गारपीट किंवा निसर्गनिर्मित इतर कोणत्याही कारणामुळे निर्माण झालेल्या आपत्ती यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाल्यास शासनाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक वेळचं निविष्ठा अनुदान म्हणून नुकसान भरपाई अनुदान दिले जाते.

Compensation Grant 2023 – : वर्ष 2022 मध्ये सततच्या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते. तसेच वर्ष 2023 मध्ये सुद्धा मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांमध्ये गारपीट आणि अवेळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते.

GR

Compensation Grant 2023 -: राज्य शासनाच्या माध्यमातून जानेवारी 2023 मध्ये राज्य शासनाकडून नवीन जीआर काढण्यात आलेला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना दिले जाणारे निविष्ठा अनुदान डीबीटी च्या माध्यमातून देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. निविष्ठा अनुदान देण्यासाठी शेतकऱ्यांच्या याद्या तयार करून. शेतकऱ्यांचे आधार, त्या शेतकऱ्यांचे बँक खाते. या सर्व माहितीचे व्हेरिफिकेशन करून तसेच लाभार्थी शेतकऱ्यांची केवायसी करून. शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये अनुदान वितरण केले जाणार आहे. (केले जात आहे).

यादी

Compensation Grant 2023 – : यादीमध्ये नाव असलेल्या विशिष्ट क्रमांक मिळालेल्या जवळजवळ सर्वच शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे. याच्या अगोदर जे काही अनुदान येण्याचे किंवा त्याचे वाटप बाकी आहे. असे सर्व शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. आता अनुदानाचा वाटप चालू असताना देखील बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. अत्यंत महत्त्वाचे कारण, म्हणजे बँक खाते आधारशी संलग्न नसणे.

Compensation Grant 2023 – : शेतकरी मित्रांनो साधारणपणे अनुदान मंजूर झालेल्या आणि वाटप सुरू असलेल्या अंदाजे दहा टक्के ते पंधरा टक्के शेतकऱ्यांच्या बँक खाते आधार संलग्न नसल्याचे दिसून येत आहे. या कारणामुळे अनुदान मंजूर झालेल्या व वाटप सुरू असताना देखील अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधारशी बँक खाते संलग्न करून घ्यावे.

सततच्या पावसाचे अनुदान असेल, अतिवृष्टी गारपीट किंवा इतर काही नैसर्गिक बाबीमुळे मिळणारे अनुदान असेल हे सर्व अनुदान बँक खात्यात जमा करण्यासाठी आधारशी बँक खाते संलग्न करावे. अशा प्रकारचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

थोडक्यात माहिती

Compensation Grant 2023 – : शेतकरी मित्राकडून बऱ्याच वेळा सांगण्यात येत आहे की आम्ही आधार कार्ड शी बँक खाते संलग्न केलेले आहे. तरीदेखील अनुदान बँक खात्यात जमा झालेले नाही. अशा सर्व शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आधार कार्डशी बँक खाते संलग्न आहे का ते तपासा तसेच त्या बँक खात्याची केवायसी केलेली आहे का ते पण तपासा. धन्यवाद

Compensation Grant 2023

दुष्काळ परिस्थिती उद्भवल्यामुळे शासनाने घेतला निर्णय

राज्यात वर्ष 2023 मध्ये सरासरी पर्जन्यमानापेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे जनावरांच्या चारा टंचाईवर उपाययोजना करण्याच्या उद्देशाने राज्यातील कृषी व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागामार्फत निर्णय घेण्यात आलेला आहे.
राज्यातील जलाशयाखालील तलावाखालील असलेल्या जमिनीचा उपयोग फक्त चारा पिके घेण्यास करावा. असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे.

जर पाऊस झाला नाही तर जलाशय कोरडेच राहतील. त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या जमिनी उघड्या होतील. अशा सर्व जमिनीवर ओलावा असतो त्यामुळे त्या ठिकाणी जनावरांना लागणारा चारा पिकांची पेरणी करून चाऱ्याचे उत्पादन घेणे शक्य आहे. म्हणून राज्य शासनाच्या वतीने 21 सप्टेंबर 2023 रोजी शासन निर्णय काढून चारा पिकांची लागवड करण्यात यावी असे सांगण्यात आले आहे.
मृदू व जलसंधारण विभागाच्या आखत्यारीत असलेल्या ह्या सर्व जमिनी पुढील क्षेत्रातील जमिनी मोकळे असलेल्या जमिनी या सर्व जमिनीवर ओलावा जलाशयामुळे टिकून राहतो. अशा सर्व गाळपे-याच्या जमिनी प्रामुख्याने चारा पिकांच्या लागवडीखाली आणण्याचे निर्देश शासनाने दिलेले आहेत.Compensation Grant 2023

हे देखील राज्य शासनाच्या वतीने काढलेली एक महत्त्वपूर्ण माहिती तुमच्याजवळ असलेल्या जलाशयात जर पाणी नसेल आणि त्या ठिकाणी उघडी झालेली जमीन उघडी पडली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जनावरांसाठी चारी पिके लावू शकतात. धन्यवाद

Leave a comment

error: