Beed District and Cabinet Meeting | बीड जिल्हा आणि मंत्रिमंडळ बैठक

मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात जलसिंचन करण्याच्या हेतूने 11 जलसिंचन प्रकल्पांना मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे. हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 11,677 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याच्यासाठी लागणारा वाढीव खर्च देखील मंजूर करण्यात आला आहे.

नीरा भीमा स्थिरीकरण प्रकल्प त्याच्यासाठी त्याच्यामध्ये बीड जिल्ह्यामधील आष्टी तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे.

अंबाजोगाई

अंबाजोगाई तालुक्यामध्ये लाल कंधारी देवणी देशी गोवंशाचे जतन केले जाणार आहे. या गोवंशाचे जतन करण्याचे हेतूने अंबाजोगाई तालुक्यामध्ये त्या संबंधित केंद्र उभारले जाणार आहे. या योजनेसाठी चार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे .

अंबाजोगाई या ठिकाणी कृषी महाविद्यालयात मुला मुलींसाठी स्वतंत्र वस्तीग्रह उभारणीसाठी 105 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

महिलांचे सशक्तिकरण

जिल्ह्यातील महिलांचे सशक्तिकरण करण्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. त्याच्या अंतर्गत महिला बचत गट यांना दिले जाणाऱ्या कर्जामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्याच्यामध्ये बरेचसे बदल करून महिला सशक्तिकरण करण्याचे हेतूने हे बदल फायदेशीर राहणार आहेत. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अंदाजे एक लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे. आजच्या( 16 सप्टेंबर 2023) मंत्रिमंडळामध्ये याला मंजुरी देण्यात आली आहे.

कुंपण

Beed District and Cabinet Meeting – : सौर ऊर्जा कुंपणासाठी शेतकऱ्यांना थेट मदत हस्तांतरित होणार या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदानाची रक्कम MAHADBT च्या माध्यमातून दिली जाणार आहे. ही योजना लवकरच महाडीबीटीच्या माध्यमातून सुरू केली जाईल. बऱ्याचशा शेतकऱ्यांना वन्यजीवांचा लावलेल्या पिकांमध्ये येण्या जाण्याने नास होतो ही नासदूस होऊ नये या हेतूने सौर ऊर्जा कुंपण ही योजना शासनाच्या वतीने सुरू करण्यात येत आहे.
या कुंपणाच्या जवळ जर एखादे जनावर आले तर त्याला छोटासा झटका लागतो या झटक्याने ते जनावर मरत नाही परंतु त्याच्या मनात भीती निर्माण होते परत ते जनावर त्याच्यापाशी येत नाही या हेतूने ही कुंपण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणार आहे.

परळी वैजनाथ

परळी वैजनाथ येथे शासकीय कृषी महाविद्यालय तसेच परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी व्यवसाय व व्यवस्थापन विद्यालय. परळी वैजनाथ येथे सोयाबीन संशोधन प्रशिक्षण उपकेंद्र, सोयाबीन उत्पादनास गती देण्यासाठी केले जाणार आहे.

विहीर

मागेल त्याला विहीर योजना.( चार लाख विहिरी संपूर्ण मराठवाड्यात देण्यात येणार आहेत. असा निर्णय 16 सप्टेंबर 2023 च्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे)

भारत नेट

भारत नेट जोडणी काही गावांमध्ये केली जाणार आहे त्याच्यासाठी सुद्धा शासनाने निधीची तरतूद केलेला आहे.

अल्पसंख्याक विभाग

Beed District and Cabinet Meeting – : अल्पसंख्याक विभागासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र कार्यालय. प्रदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती पदवी व पदवी उत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण या योजनेच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे.
ही योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवली जाते. मदरशाचे अनुदान दोन लाखाहून थेट 10 लाख करण्यात आले आहे.

परळी वैजनाथ

परळी वैजनाथ विकास आराखड्यामध्ये आयुर्वेदिक पार्कचा समावेश करण्यात आलेला आहे.( परळी वैद्यनाथ म्हणजे आयुर्वेदाचे देवता)

बीड

बीड या ठिकाणी सिताफळ व इतर पिकांसाठी प्रक्रिया उद्योगासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

माजलगाव

सार्वजनिक आरोग्य विभाग माजलगाव या ठिकाणी ट्रामा केअर सेंटर ची तरतूद करण्यात आली आहे.

धारूर

धारूर तालुक्यातील तेलगाव या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयास निधी मंजूर करण्यात आला आहे

वडवणी

वडवणी मध्ये ग्रामीण रुग्णालयास निधी मंजूर करण्यात आला आहे.

पाटोदा

मृदू व जलसंधारण विभागामार्फत पाटोदा तालुक्यातील रोहतवाडी , उंबर विरा साठवण तलाव त्यांना मंजुरी

आष्टी शिरूर

आष्टी शिरूर तालुक्यात कोल्हापुरी साठवण बंधाऱ्याचे काम केले जाणार आहे.

सोसायटी

18 निजामकालीन पोलीस ठाण्याच्या कायापालट यामध्ये बीड ,परळी, आंबेजोगाई.
पोलीस हाऊसिंग सोसायटी सोसायटीसाठी 300 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

बस स्थानक

परिवहन विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध ठिकाणी बस स्थानक निर्मितीसाठी मंजुरी देण्यात आली आहे.

प्रशासकीय इमारत

सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अंतर्गत बीड येथे प्रशासकीय इमारत तसेच पाटोदा या ठिकाणी प्रशासकीय इमारत बांधकामास मंजुरी मंजुरी देण्यात आली आहे.

ग्रामविकास विभाग

Beed District and Cabinet Meeting – : ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतला स्वतःचे कार्यालय उभारणीसाठी बाळासाहेब ठाकरे समृद्धी मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत ही कामे केली जाणार आहेत. त्यासाठी सुद्धा शासनाने निधी मंजूर केलेला आहे.( मराठवाड्यासाठी तीन वर्षासाठी 180 कोटी रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे)

जिल्हा परिषद

बीड जिल्हा परिषद इमारतीसाठी 35 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

परळी

परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रास मंजुरी देण्यात आली आहे. ऊर्जा विभागांतर्गत ही तरतूद करण्यात आली आहे.

महसूल

महसूल विभागाअंतर्गत बीड जिल्हा अधिकारी कार्यालय इमारत बांधकामासाठी 63 कोटी रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Beed District and Cabinet Meeting

मदत व पुनर्वसन विभाग

मदत व पुनर्वसन विभाग जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था मजबूत करण्याच्या हेतूने प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्र, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे बळकटीकरण करणे.( हे बळकटीकरण करण्यासाठी मराठवाड्यासाठी 55 कोटी रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे)

सुकळी

बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील सुकळी या गावाचे पुनर्वसन केले जाणार आहे.

पशुसंवर्धन विभाग

पशुसंवर्धन विभाग याच्या माध्यमातून दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत किमान प्रत्येक गावामध्ये 50 जनावरांचे वाटप करण्यात येणार आहे.( या योजनेसाठी मराठवाड्याला 3200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तसेच ही योजना आठ हजार सहाशे गावामध्ये राबवण्यात येणार आहे.)

सांस्कृतिक कार्य विभाग

सांस्कृतिक कार्य विभाग याच्या अंतर्गत आंबेजोगाई संगमेश्वर महादेव मंदिर, महादेव मंदिर ( मराठवाड्यातील निवडक मंदिरांसाठी 253 कोटी 70 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे)

शालेय शिक्षण विभाग

शालेय शिक्षण विभाग याच्या अंतर्गत ऊसतोड कामगारांच्या मुलींसाठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सोळाशे मुलींसाठी (1600) 80 कोटी रुपयांची तरतूद करून मंजुरी देण्यात आली आहे.

ऊसतोड

बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी मुलांसाठी शालेय शिक्षण विभागाचे मार्फत काम केले जाणार आहे.

नदीजोड प्रकल्प

बीड जिल्हा तसेच मराठवाड्यातील नदीजोड प्रकल्प हा देखील राबविण्यात येणार आहे. या नदीजोड प्रकल्पाचे कामे सद्यस्थितीत चालू आहेत.
या प्रकल्पासाठी शासनाकडून निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.

अंगणवाड्या

नियोजन विभागाच्या माध्यमातून मराठवाडा विभागासाठी 3439 अंगणवाड्यांसाठी 386 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

वरील सर्व विविध विभागातील योजनांचा लाभ बीड जिल्ह्याला मिळणार आहे. अशी घोषणा 16 सप्टेंबर 2023 च्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली आहे.

Leave a comment

error: