Average productivity | सरासरी उत्पादकता

नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानी करिता काढण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार 25 टक्के पिक विमा किंवा पीक कापण्याच्या अंतिम अहवालाच्या आधारे देण्यात येणारा पिक विमा असो तसेच इतर नैसर्गिक आपत्तीमुळे देण्यात येणारे शासकीय अनुदानअसो हे सर्व देण्यासाठी ज्याचा आधार घेतल्या जातो ते म्हणजे सरासरी उत्पादकता.
आपल्या तालुक्याची आपल्या जिल्ह्याची आपल्या पिकाची सरासरी उत्पादकता कशी पाहिल्या जाते याची सविस्तर माहिती पाहूया

सुरुवातीला तुम्हाला तुम्हाला कृषी विभागाच्या वेबसाईटवर यायचे आहे. https://Krishi.maharashtra.gov.in/ या साईटला ओपन करा.

कृषी विभागाची साईट ओपन झाल्यानंतर मुख्य पृष्ठावर तुम्हाला विविध प्रकारचे टॅब आहेत. त्यामधील सांख्यिकी नावाच्या टॅब वर यायचे आहे.

सांख्यिकी या टॅब मध्ये पिकांचे आकडेवारी क्षेत्र उत्पादन उत्पादकता याच्यावर आल्यावर पुढे तुम्हाला राज्य व जिल्हा असे ऑप्शन दिसतील.
या दोन्ही प्रकारांमध्ये तुम्ही उत्पादकता पाहू शकता.

जिल्हा याच्यावर क्लिक करा.

पुढे तुम्हाला दिसेल 2023 असेल 2022असेल 2021 असेल 2020 असेल या ठिकाणी तुम्हाला जिल्हा निहाय उत्पादकता दिसेल. तसेच उत्पादनाचे क्षेत्र ही सर्व माहिती तुम्हाला दिसेल.

Average productivity – : एखाद्या वर्षाची माहिती पाहण्यासाठी त्या समोरील असलेल्या डाऊनलोड ऑप्शन मधील या वर्षाची फाईल डाऊनलोड करायचे आहे तिच्यावर क्लिक करून डाऊनलोड करा.

फाईल डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये पिकाखालील क्षेत्र त्याची उत्पादकता ही सर्व माहिती त्या फाईल मध्ये दिसेल. वेगवेगळी पिके व त्या पिकांचे असलेले क्षेत्र उत्पादन उत्पादकता त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल.Average productivity

तालुक्याची उत्पादकता अशी पाहतात

सांख्यिकी — > पीक कापणी प्रयोग — > तालुका निहाय उत्पादकता याच्यावर क्लिक करा.

त्याला क्लिक केल्यानंतर पुढील पेज मध्ये उडीद, मुग, सोयाबीन, बाजरी, मका, तुर, राईस, कापूस, सूर्यफूल अशा विविध पिकांची उत्पादकता देण्यात आलेली आहे.

Average productivity – : सोयाबीनची तालुका नीहाय उत्पादकता याच्यावर जर आपण क्लिक केलं. तुमच्यासमोर एक पीडीएफ ओपन होईल तिच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. जिल्हा, तालुक्याचे नाव आणि त्या तालुक्यामधील 2016-17, 2017-18, 2018-19 ,2019-20 आणि 2020 21 अशी एकूण पाच वर्षाची उत्पादकता त्या ठिकाणी तुम्हाला देण्यात आलेली आहे. 2022-23 ची आपण वरी सांगितल्याप्रमाणे पाहायची आहे.

बरेच जिल्हे आहेत ज्या ठिकाणी सोयाबीनचे उत्पादन होत नाही ते जिल्हे या पीडीएफ मध्ये नील दाखवण्यात आलेले आहेत.

ज्या जिल्ह्यांमध्ये सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते त्याचे उत्पादकता आणि उत्पादन दाखवण्यात आलेले आहे.

Average productivity – : सरासरी उत्पादकता काढण्यासाठी या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या पाचही वर्षाची बेरीज केली जाते. आणि आलेल्या बेरजेला पाच ने डीवाईड करून. जो काय आकडा येईल ती उत्पादकता दाखवली जाते.

Average productivity

तुम्हाला ज्या पिकाची उत्पादक पाहायची आहे ते पीक तुम्ही निवडून उत्पादकता पाहू शकता.

ही अत्यंत उपयुक्त माहिती तुम्ही वरील दिलेल्या माहितीच्या आधारे पाहू शकता धन्यवाद.Average productivity

Leave a comment

error: