Appointments of Additional Gram Sevaks | अतिरिक्त ग्रामसेवकांच्या नियुक्त्या

ग्रामपंचायत स्तरावरील अतिरिक्त ग्रामसेवकांच्या नियुक्त्या संदर्भात महत्वपूर्ण अपडेट

राज्य शासनाच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर ग्रामपंचायत स्तरावरील अतिरिक्त ग्राम रोजगार सेवकांच्या नियुक्ती संदर्भात 18 सप्टेंबर 2023 रोजी शासन निर्णय काढण्यात आलेला आहे याची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे

Appointments of Additional Gram Sevaks – : राज्यामध्ये 14 डिसेंबर 2022 पासून सर्वांगीण ग्राम समृद्धी योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. याच्या अंतर्गत कुटुंब समृद्ध करण्यासाठी विविध प्रकारच्या कामांचा समावेश करण्यात आलेला आहे. याच कामांसाठी राज्य शासनाच्या कडून 29 मे 2023 रोजी शासन निर्णय काढला आहे. राज्यामधील अकुशल रोजगारामध्ये वाढ करण्यासाठी त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी ग्रामरोजगार सेवकांच्या नियुक्ती करण्यासाठी काही विशिष्ट ग्रामपंचायतीला मुभा देण्यात आली होती. ही निवड प्रायोगिक तत्त्वावर एक वर्षासाठी होती. ज्या ग्रामपंचायत मध्ये एका आर्थिक वर्षात 1000 पेक्षा कमी मनुष्य दिवस निर्मिती होते. अशा ग्रामपंचायतीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर एका वर्षासाठी अतिरिक्त ग्राम रोजगार सेवकांची नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

29 मे 2023 रोजी शासनाने जो जीआर काढला त्याचा वीपर्यास करण्यात आला. म्हणजे शासनाने ज्या ग्रामपंचायत मध्ये वरी सांगितल्याप्रमाणे काही दिवसांची निर्मिती किंवा त्या ठिकाणी मनुष्यबळांची कमतरता होती. अशा ग्रामपंचायतींना एक वर्ष कालावधीसाठी अतिरिक्त ग्राम रोजगार सेवकांची नियुक्ती प्रायोगिक तत्त्वावर करण्याची मंजुरी दिली होती. परंतु राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीने सरसकट राज्य शासनाने काढलेल्या जीआर चा चुकीचा अर्थ करून अतिरिक्त ग्राम रोजगार सेवकांच्या नियुक्ती करून टाकल्या.Appointments of Additional Gram Sevaks

Appointments of Additional Gram Sevaks

या चुकीच्या नियुक्त्यांच्या संदर्भात राज्य शासनाकडे बऱ्याचशा तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत.

अतिरिक्त ग्रामरोजगार सेवकांचे नियुक्ती कुठे केल्या जाणार होत्या ?

  • ज्या ग्रामपंचायत मध्ये एका आर्थिक वर्षांमध्ये हजार पेक्षा कमी मनुष्य दिवसाची निर्मिती झालेली असेल अशा ठिकाणी नियुक्ती देणे शासनाने मंजूर केले होते.
  • ज्या ग्रामपंचायत मध्ये 50 हजार मनुष्य दिवसापेक्षा जास्त मनुष्य दिवस निर्मिती होतात अशा ठिकाणी नियुक्ती देणे शासनाने मंजूर केले होते.

वरील सांगण्यात आलेल्या केवळ दोन प्रकारच्या ग्रामपंचायतींना अतिरिक्त ग्राम रोजगार सेवकांच्या नियुक्ती राज्य शासनाने मंजूर केले होते

Appointments of Additional Gram Sevaks – : वरील सांगण्यात आलेल्या केवळ दोन प्रकारच्या ग्रामपंचायती शिवाय इतर ग्रामपंचायतीने नियुक्त केलेल्या अतिरिक्त ग्राम रोजगार सेवकांच्या नियुक्ती अवैध समजण्यात येतील.

अपील

  • कोणत्याही ग्रामपंचायत मध्ये ग्राम रोजगार सेवकाबाबत ग्रामपंचायतिने घेतलेल्या निर्णयावर कारवाई करण्यापूर्वी तिच्या संबंधित ग्राम रोजगार सेवकास उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनरेगा जिल्हा परिषद यांच्याकडे अपील करण्यासाठी दिनांक 4 सप्टेंबर 2017 च्या शासन निर्णयानुसार अपिल करण्याची मुभा राहील.

Appointments of Additional Gram Sevaks – : राज्य शासनाच्या वतीने 18 सप्टेंबर 2023 रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आले आहे. अतिरिक्त ग्राम रोजगार सेवक च्या नियुक्ती सरसकट केल्या असतील तर त्या अवैध ठरवण्यात आल्या आहेत. तरी अतिरिक्त ग्राम रोजगार सेवकांच्या नियुक्ती रद्द करण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने निर्णय घेतला. तर त्या ठिकाणी काम करत असलेल्या अतिरिक्त ग्रामसेवकाला जिल्हा परिषद मनरेगा उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे न्याय मागण्याचा हक्क आहे. याची नोंद ग्रामपंचायत मध्ये काम करत असलेल्या अतिरिक्त ग्राम रोजगार सेवक यांनी घ्यावी. धन्यवाद Appointments of Additional Gram Sevaks

Leave a comment

error: