Agriculture Building | कृषी भवन

Agriculture Building – : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून सर्व सुविधायुक्त कृषी भवन बांधकामासाठी शासनाकडून 14 कोटी 90 लाखाचा निधी केला मंजूर.

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकाच छताखाली सर्व योजना व योजनांची माहिती मिळावी या उद्देशाने राज्याचे कृषी विभागाकडून कृषी भवनाचा प्रस्ताव मागवण्यात आला आहे. या कृषी भवन बांधकामासाठी शासनाकडून निधी मंजूर झालेला आहे.

बीड जिल्ह्यामध्ये पालवन रस्त्यावर जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय आहे. परंतु त्या ठिकाणी सर्व विभाग नाहीत कृषी कार्यालयासंबंधीत कामे व त्यांची विभाग एका ठिकाणी नाहीत. म्हणजे अनेक वेळा शेतकऱ्यांना वेगवेगळ्या कार्यालयात चक्र माराव्या लागतात. अशी होणारी शेतकऱ्यांची तारांबळ पाहून राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी भवनचा प्रस्ताव मागविला होता.

Agriculture Building – : जिल्ह्याचे कृषी अधिकारी यांनी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून हा प्रस्ताव राज्याच्या कृषी विभागाकडे सादर केला. तो प्रस्ताव शासनाकडून मंजूर करण्यात आलेला आहे. त्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

जिल्हास्तरावर आपल्या कामासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सर्व सुविधा एकाच छताखाली मिळाव्यात तसेच विविध योजना व त्यासाठी आवश्यक पूरक बाबी या सर्व एकाच ठिकाणी मिळाव्यात. याच्यासाठी हे कृषी भवन सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे. या कामामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.

Agriculture Building

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्व सुविधा एका छताखाली मिळाव्यात या उद्देशाने राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी कृषी भवन इमारतीसाठी 14 कोटी 90 लाख रुपये मंजूर करून आणले. आता या टोले जंग इमारतीमध्ये सर्व सुविधा एका छताखाली सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहेत.Agriculture Building

Leave a comment

error: