25% crop insurance | 25% पिक विमा

राज्यातील सोळा जिल्ह्यामध्ये पावसाच्या खंडामध्ये पिकांचे नुकसान झाले आहे. अशा जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढून 25% पिक विमा रक्कम 21 दिवसाच्या आत खात्यावर जमा होणे अपेक्षित होते. परंतु आता नवीनच पेच निर्माण झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील तसेच इतर चार जिल्ह्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या अधिसूचनेवर विमा कंपन्यांनी हरकत घेतली आहे. त्यामुळे आता विमा संरक्षित 25% रक्कम मिळण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या आठवड्यामध्ये विमा संरक्षित रकमेवरील मार्ग निघणे अपेक्षित आहे. 25% crop insurance

सोलापूर जिल्ह्यामधील मागील बऱ्याच कालावधीपासून पाऊस नसल्याकारणाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे नुकसान पाहून त्या ठिकाणी असणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी पिक विमा संरक्षित रक्कमेसाठी आधी सूचना काढली. परंतु या अधिसूचनेवर त्या ठिकाणी असणाऱ्या विमा कंपनीने विमा संरक्षित 25% रक्कम देण्यास हरकत घेतली आहे.

25% crop insurance – : राज्यातील परभणी ,बीड ,धाराशिव ,अकोला, बुलढाणा, सातारा ,सांगली ,जालना ,छत्रपती संभाजी नगर ,नंदुरबार ,नगर ,नाशिक, सोलापूर, लातूर, नांदेड ,जळगाव या ठिकाणी झालेल्या पिकांच्या नुकसानी करिता. त्या ठिकाणी असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिसूचना काढण्यात आल्या आहेत. या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे 50 टक्क्याहून अधिक नुकसान झाल्याचे दिसते. अशा सर्व शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेच्या पंचवीस टक्के(25%) नुकसान भरपाई मिळणार आहे.

25% crop insurance – : जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत आलेल्या अधिसूचना काढल्यापासून 21 दिवसाच्या आत मदत वितरित होणे अपेक्षित आहे. परंतु सरकारकडे प्रलंबित शेतकरी हिस्सा आणि या 16 जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी सरसकट जिल्ह्यासाठी काढलेली आधी सूचना अशा सर्व बाबींमुळे विमा संरक्षण रक्कम (मिळणारी मदत) लांबणीवर पडू शकते. अशी माहिती कृषी विभागातील अधिकाऱ्यांमार्फत समोर येत आहे.

विमा कंपन्यांच्या म्हणण्यानुसार जिल्ह्यातील खरीप पिकांचे नुकसान झालेले नसतानाही. लातूर, नांदेड, सोलापूर ,परभणी यासह बऱ्याचशा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सरसकट नुकसानीच्या आधी सूचना काढण्यात आली आहे. या विषयावर विमा कंपनीने हरकत घेतल्याने विमा संरक्षित रक्कम मिळण्यास पेच निर्माण झाला आहे.

राज्यात झालेला सरासरी पाऊस (महिन्यानुसार)

 • जून महिना 207.6 मिलिमीटर
 • जुलै महिना 330.9 मिलिमीटर
 • ऑगस्ट महिना 286 मिलिमीटर
 • सप्टेंबर महिना 123.9 मिलिमीटर
 • एकूण पाऊस 948.4 मिलिमीटर

राज्यात अपेक्षित असलेला पाऊस(पडलेला पाऊस)

 • जून महिना 111.3 मिलिमीटर
 • जुलै महिना 459 मिलीमीटर
 • ऑगस्ट महिना 107.9मिलिमीटर
 • सप्टेंबर महिना 101.7 मिलिमीटर
  पडलेला एकूण पाऊस 779.9 मिलिमीटर

या ठिकाणी पडलेल्या पावसाचे तसेच राज्यात सरासरी अपेक्षित असलेल्या पावसाचे आकडे दिसत आहेत. यामध्ये जून, जुलै या महिन्यामध्ये जेवढा पाऊस अपेक्षित होता. त्यापेक्षा पाऊस कमी प्रमाणात पडला. या कारणाने पिकाची होणारी वाढ खुंटली. पुढे ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यांमध्ये तर खूपच कमी प्रमाणात पाऊस पडलेला आहे. या कारणामुळे पिकामध्ये जे बी भरल्या जाते किंवा शेंगा भरल्या जातात. त्या व्यवस्थित भरल्या गेलेल्या नाहीत. अशा कमी पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक शेतात काही प्रमाणात दिसत असले. तरी ते पीक काढणीचा खर्च देखील शेतकऱ्यांना पीक काढल्यानंतर आलेले उत्पादनातून मिळणार नाही. म्हणजेच या ठिकाणी शेतकऱ्यांचे 50% पेक्षा जास्त नुकसान झालेले आहे.

25% crop insurance | 25% पिक विमा

हेक्टरी किती भरपाई मिळणार ? 25% crop insurance

25% crop insurance – : राज्यातील 23 जिल्ह्या मध्ये शेतकऱ्यांच्या हातून खरीप गेलेला आहे. कारण, या भागामध्ये मागील 21 दिवसापेक्षा जास्त कालावधीपासून पाऊस नाही. या शेतकऱ्यांच्या पिकांची 50% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिकानुसार विमा संरक्षित रक्कम म्हणून 25% नुकसान भरपाई मिळणार आहे.
सुरक्षित रक्कम पीकनिहाय हेक्टरी चार हजार(4000) ते (10000) दहा हजार रुपयापर्यंत मिळेल. विमा संरक्षित रकमेच्या निकषानुसार ज्या शेतकऱ्यांचे 50 टक्के पेक्षा कमी नुकसान झालेले आहे. अशा शेतकऱ्यांना पिक विमा निकषानुसार नुकसान भरपाई मिळणार नाही. याची नोंद घ्यावी.

यावर्षी राज्यातील एकूण एक कोटी सत्तर लाख 67 हजार शेतकऱ्यांनी पिक विमा उतरवलेला आहे. यावर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा दिलेला आहे. यामुळे पिक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांच्या हिश्याची रक्कम 1551 कोटी एवढी रक्कम राज्य सरकारला विमा कंपन्यांना द्यावी लागणार आहे. या रकमेमधील 501 कोटी रुपये एवढी रक्कम विमा कंपन्यांना देण्यात आलेली आहे. उर्वरित रक्कम लवकरच चार ते पाच दिवसात दिली जाणार आहे. ही रक्कम राज्य सरकारने दिल्यानंतर पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा बाधित झालेल्या शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून नुकसानीतील 25% विमा संरक्षित रक्कम मिळणार आहे. 25% crop insurance

Leave a comment

error: