पीक विमा योजना 2023 प्रधानमंत्री पिक विमा योजना

प्रधानमंत्री पिक विमा योजना 2016 पासून महाराष्ट्र राबविण्यात येत आहे सर्वसमावेशक पीक विमा योजना 2023 च्या यंदाच्या खरीप हंगामापासून 2025-26 च्या रब्बी हंगामा पर्यंत लागू असणार आहे

नवीन बदलानुसार शेतकऱ्याला आता केवळ ‘1 रुपया मध्ये’ पिक विमा उतरता येणार आहे.

–> सर्वसमावेशक विमा योजना व सहभाग, पात्रता, निकष

त्याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
–> नेमकं काय बदल झालेत ??
प्रधानमंत्री पिक विमा योजना – : नेमकं काय बदललं तर प्रधानमंत्री पिक विमा योजना शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या 2% इतका विमा आता भरावा लागायचा तर रब्बी हंगामासाठी विमा संरक्षण रकमेच्या 1.5% इतका भरावा लागायच्या आणि अर्थात खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या 5% इतका भरावा लागायचा. आणि ही रक्कम 700,800,2000 हजार रुपयापर्यंत ‘ प्रति हेक्टर ‘ जायची पण आता मात्र शेतकऱ्यांना केवळ 1 एक पिकाला 1 रुपये भरून सहभाग घेता येतो.

बरेच,शेतकरी कर्जदार किंवा बिगर कर्जदार असणाऱ्या साठी ही योजना त्यांच्या इच्छेवर सहभाग नोंदवू शकतात.

त्याशिवाय भाडेतत्त्वावर जे शेतकरी इतरांची शेती करतात ते सुद्धा या योजनेत सहभागी होऊ शकणार आहेत .

प्रधानमंत्री पिक विमा योजना

–> 🙏कोणत्या पिकांसाठी विमा संरक्षण लागू ??
खरीप हंगामातील भात, ज्वारी, नाचणी, बाजरी ,मका, तूर, उडीद, काळे, सूर्यफूल, सोयाबीन,भुईमूग, कापूस, खरीप कांदा या पिकांना संरक्षण देण्यात आले.

–> 🙏 रब्बी हंगामातील पिके
ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात, गहू, उन्हाळी कांदा या पिकांना विमा संरक्षण देण्यात आले.

आता या योजनेत सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही स्वतः पीक विमा योजनेच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता किंवा गावातल्या सीएससी केंद्रावर जाऊन सुद्धा ऑनलाईन नोंदणी करू शकता.

प्रधानमंत्री पिक विमा योजना

–>>🙏🏻 ऑनलाइन अर्ज कसा करायचा🙏🏻 <<–
पिक विमा योजनेत ” स्वतःहून ऑनलाईन अर्ज ” करायचा असेल तर सगळ्यात आधी PMFBY.GOV.IN ही साईट सर्च करा त्यानंतर प्रधानमंत्री पिक विमा योजनेची Website open होईल.
1) इथल्या फार्मर कॉर्नर या पर्यावर क्लिक करायचं आहे.
2) त्यानंतर Guest Farmer पर्यायावर क्लिक करायचे आहे.
आता नवीन शेतकरी म्हणून तुम्हाला नोंदणी करायची आहे येथे सुरुवातीला शेतकऱ्याची माहिती टाकायची आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना – : या शेतकऱ्याचं पूर्ण नाव, रिलेशनशिप मध्ये अर्जदार कोणाचा मुलगा व पत्नी आहे ते निवडायचे आहे मग पती किंवा वडीलाचे नाव टाकायचे आहे मोबाईल नंबर टाकून Verify या बटन वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर स्क्रीनवर एक Captcha codeदिसेल. तो जसा आहे तसा टाकून घ्या व Get OTPया पर्यायावर क्लिक करा. मोबाईलवर आलेला OTP टाकून Submit या बटणावर क्लिक करायचं आहे. मग ,Verification Success झाल्याचं तिथं तुम्हाला दिसून येईल यानंतर वय जात किंवा प्रवर्ग आणि लिंग निवडायचं आहे पुढे शेतकऱ्याचा प्रकार म्हणजे तो अल्पभूधारक आहे आणि त्या अल्पभूधारक आहेत ते निवडायचे आहे मग Farmer Category मध्ये जर अर्जदार जमिनीचा मालक आहे की भाडे तर जमीन करतो ते निवडायचे आहे.

त्यानंतर तुम्हाला पत्त्या विषयी माहिती भरायची आहे(Residential Details)
1) राज्य 2) जिल्हा 3) तालुका 4)गाव निवडायचे आहे .
पुढे, सर्व पत्ता टाका पिन टाका फार्मर आयडी ID पुन्हा uid निवडा. आणि मग तुमचा आधार नंबर अचूकपणे टाकायचा आहे तिथे असलेल्या Verify या पर्यायावर क्लिक करायचं आहे.त्यानंतर Screen Verification Success झाल्याचा मेसेज दिसेल.

पुढे, बँक खात्याचा देखील टाकायचा आहे.
1) बँकेचा ifsc माहिती असेल तर yes म्हणायचं आहे नसेल तर No या पर्यायावर क्लिक करायचे आहे मग राज्य जिल्हा बँकेचे नाव शाखा निवडायचे आहे शाखा निवडले की त्या समोरच्या शाखेचा ifsc कोड आपोआप आलेला दिसेल येईल.
पुढे, बँक खात्याचा नंबर टाकायचा आहे तो पुन्हा टाकून Confirm करायचा आहे. खालील दिलेला Captch Code टाकून. Create User पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्ही Fill केलेली Information तुम्हाला स्क्रीनवर दिसेल ती व्यवस्थित वाचून Next ला क्लिक करा व पुढे , तुमच्या बँक खात्याचा तपशील दिसेल. या दोन्ही पैकी एक खाता तुम्हाला निवडा आणि Next क्लिक करा.

आता, तुम्हाला पिक विमा योजना आणि किती क्षेत्रावर पिक विमा उतरायचा आहे यासंबंधीची माहिती भरायची आहे. तिथं राज्य महाराष्ट्र आहे समोर योजनेचे नाव प्रधानमंत्री फसल बीमा योजना निवडायचे आहे त्यानंतर तिथे खरीप सीजन आणि वर्ष 2023 ही माहिती आपोआप येईल.Land Details मध्ये तुम्हाला पिकाची माहिती भरायची आहे. येथे असलेल्या गोल वर्तुळाला दाबले की तुम्ही ती माहिती भरू शकता. जर तुम्ही मूग, सोयाबीन, कापूस अशा अनेक पिकांसाठी विमा उतरणार असाल. तर Mix Cropping yes करायचे आहे. पण एकाच पिकाच विमा भरणार असाल तर त्या समोरील No पर्यायावर क्लिक करायचे आहे.मग, तुम्हाला 1 पिक विमा निवडायचा आहे. त्याच्यावर तुम्हाला पिक विमा उतरायचा आहे. पुढे पेरणी Date निवडायचे आहे. पुढे Account No. टाकायचा आहे व गट क्रमांक टाकायचा आहे पुढच्या पर्यायावर क्लिक करायचे आहे मग स्क्रीनवर तुम्हाला तुमच्या नावाचे क्षेत्र किती आहे हे दिसेल. तिथल्या वर्तुळावर क्लिक करून तुमचा क्षेत्र आधीच इन्शुर आहे की नाही ते बघायचं आहे आणि मग Subit करायचा आहे.

या पर्यायासमोर तुम्हाला जेवढ्या क्षेत्रावर विमा उतरवायचा आहे तेवढे क्षेत्र कमी जास्त करू शकता. त्यानुसार विमा हप्त्याची रक्कम ही कमी किंवा जास्त तुम्हाला झालेली दिसून येईल. पुढं, त्या क्षेत्रासाठी तुम्हाला किती हप्ता भरावा लागेल ते फार्मर शेअर्समध्ये दाखवलं जाईल. आता, इथं किती रक्कम दिसत असली तरी शेवटी Payment करताना तुम्हाला 1 रुपया भरावा लागणार आहे .इथे असलेल्याNext पर्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

–> 🙏 कागदपत्र अपलोड 🙏<–

1) बँकेच्या पासबुक चा फोटो अपलोड करायचा आहे
2) त्यानंतर नुकताच काढलेला डिजिटल सहीचा सातबारा उतारा आणि आठ उतारा हे दोन्ही एकच फेजमध्ये अपलोड करायचे आहेत.
3) पिक पेऱ्याच्या घोषणापत्र अपलोड करायचा आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजना – : या घोषणा पत्राचा एक नमुना अर्ज तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. हा जो नमुना अर्ज आहे तसं तुम्ही घोषणापत्र लिहू शकता त्यावर स्वतःची सही करून ते तुम्हाला तिथे अपलोड करायचे आहे. हे अपलोड करून झाले की त्यासमोर असलेल्या Upload या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि मग, त्याच फोटोच्या समोर तुम्हाला Success केल्याचा ते फोटो अपलोड झाल्याचा मेसेज दिसून येईल. तिथं Next वर क्लिक केलं की शेतकऱ्याची व पिकाची माहिती दाखवली जाईल किती प्रीमियम भरायचे आहे. ते दिसेल तिथे असलेल्या Submit या बटनावर क्लिक करायचे आहे.Submit या बटणावर क्लिक करून झाले की, तुमच्या मोबाईलवर एक मेसेज पाठवला जाईल. या तुमच्या अर्जाचा क्रमांक, विम्याची रक्कम याची माहिती नमूद केली असेल. आता, तुम्हाला Payment करायचा आहे. 1 रुपये इतकं तुम्हाला इथं पेमेंट करायचं आहे ते पेमेंट तुम्हाला Debits card, Internet Banking, UPI, QR Code किंवा Credit Card वापरून करू शकता.Payment झालं की शेतकरी अर्जाची पावती तुम्हाला स्क्रीनवर दिसून येईल.इथं खाली print Policy Receipt असलेल्या या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमच्या विमा योजनेत सहभागाची पावती Download शकता.

अशा रीतीने “ शेतकरी स्वतःचे पीक विमा योजनेतऑनलाईन पद्धतीने सहभागी होण्यासाठी अर्ज करू शकतात.

–> लक्षात,
प्रधानमंत्री पिक विमा योजना – : ठेवायची पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्ही अर्ज केला याचा अर्थ तुम्ही, या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरलात असा होत नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या शेतातील शेतमालाचा नुकसान झालं तर ते “नुकसान झाल्याच्या 72 तासाच्या ” अगोदर तुम्हाला तशी माहिती पिक विमा कंपनीला द्यावी लागते.

त्यानंतर विमा कंपनीचे कर्मचारी आणि राज्य सरकारची काही कर्मचारी येऊन पाहणी करतात. आणि मग पिक विमा योजनेच्या नियमानुसार तुम्ही योजनेच्या लाभासाठी तुम्ही पात्र आहेत की नाही ते त्यांच्याकडून ठरवलं जातं.

सर्व समावेशक पीक विमा योजनेबद्दल सविस्तर माहिती सांगणारी bhagirathigold.com तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. धन्यवाद

Leave a comment

error: