डोळे येऊ नये याच्यासाठी मार्गदर्शक सूचना

डोळे येणे हा एक संसर्गजन्य आजार आहे तो फार गंभीर नसला तरी तो डोळ्या सारख्या नाजूक भागाला होतो. होतो बऱ्याच वेळा नीट होण्यास खूप वेळ लागतो त्याच्यामुळे हा आजार होऊ नये याच्यासाठी काळजी घ्यावी लागते.

मार्गदर्शक सूचना – :

–> डोळ्यांची साथ पसरण्याची कारणे <–


हवेतील आद्रता, ओलावा, आपल्या अंगाला येणारा घाम, सतत चेहरा पुसणे, सतत डोळ्याला हात लावणे. वरील सर्व कारणामुळे डोळे येण्याची साथ वेगाने पसरत आहे.

–> डोळे आलेले कसे ओळखाल <–


मार्गदर्शक सूचना – : तुमच्या डोळ्यातून येणारे पाणी ,तुमचे डोळे लाल होणे, डोळे खाजवणे, खाजणे, चिकट होणे. प्रकाशात गेल्यावर त्याचा त्रास होणे .तसेच या सर्व गोष्टीमुळे तुम्हाला ताप सर्दी खोकलाई थोडाफार जाणू शकतो.

–> डोळे आले तर काय करावे <–


डोळे आले तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने काही औषधे घ्या जर तुम्ही औषधे वेळची वेळ घेतली तर हा आजार घरातील इतर व्यक्तींना होत नाही. तो आजार जास्तीत जास्त एक ते दोन आठवडे राहतो जर तुम्ही दिवसातून साध्या पाण्याने वारंवार डोळे दुखले तरी देखील तुमचे डोळे स्वच्छ होऊन हा आजार दूर होतो.

–> डोळे येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी <-


मार्गदर्शक सूचना – : घरातील टॉवेल हात रुमाल हे स्वच्छ असलेले वापरावे. बाहेर गेल्यास कुणाची गळाभेट घेऊ नये. हातात हात देऊ नये. डोळ्याला हात लावू नये. व सतत हात स्वच्छ धुवावा.

अशाच नवनवीन विषयावरील सविस्तर माहितीसाठी आमच्या bhagirathigold.com वेबसाईट च्या ग्रुपला जॉईन व्हा धन्यवाद.

Leave a comment

error: