ई पीक पाहणी महत्त्व

ई पीक पाहणी

ई पिक पाहणे महत्त्व आणि पिक विमा घोटाळा

प्रिय शेतकरी बंधूंनो राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पिक विमा घोटाळा उघड झालेला आहे.

असा घोटाळा होऊ नये म्हणून शेतकरी बंधूंनी काय काळजी घ्यावी.
1) ई पीक पाहणी केली पाहिजे का ?
2) ई पीक पाहणी नाही केली तर काय परिणाम होतात ?
3) ई पीक पाहणी चुकीच्या पद्धतीने केली तर काय होते ?

वरील प्रश्नांची उत्तरे आज आपण घेणार आहोत.

शेतकरी बंधूंनो ई पिक पाहणे शेतकरी वर्ग गांभीर्याने घेत नाही. बंधूंनो ही पिक पाहणे गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. आता जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ती तुम्ही शंभर टक्के गांभीर्याने घ्या.

शेतकरी बंधूंनो शासनामार्फत पीक विमा योजना ही खूप चांगल्या पद्धतीने राबवली जात आहे पिक विमा फक्त एक रुपयात शासन उतरवत आहे.

शेतकरी बंधूंनो विविध चैनल ने फळबाग पिक विमा घोटाळा उघड किस आणला होता. त्याच्यामध्ये पुणे जिल्हा ,सांगली, जालना तसेच बीड ,धाराशिव ,लातूर जिल्हा काही शेतकऱ्यांच्या नावे चुकीच्या पद्धतीने पिक विमा भरला गेला होता. त्याच्या केसेस आलेल्या होत्या.

शेतकरी बंधूंनो खरिपामध्ये देखील असा घोटाळा उघडकीस येऊ शकतो.

राज्य शासनाच्या GR मध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे ही पीक पाहणी केलेले पीक हेच अंतिम पिक मानले जाईल.

बरेचसे शेतकरी शेतात लावलेल्या पिकाची ई पिक पाहणी करत आहेत जे शेतकरी शेतात लावलेल्या पिकाची ई पीक पाहणी करत नाहीत त्यांना याचा गंभीर परिणाम येणाऱ्या काळामध्ये भोगाव लागेल.

शेतकरी बंधूंनो शासनामार्फत सांगितले जाते सोयाबीनचे इतके क्षेत्र लागवडीखाली आहे कपाशीचे एवढे क्षेत्र लागवडीखाली आहे असे विविध पिकांची माहिती शासनाकडून आपल्यापर्यंत पोहोच केली जाते.

बरेचसे शेतकरी अनुदान भेटण्यासाठी घोषणा पत्रामध्ये सोयाबीन आणि कपाशी हे पिके लिहितात.

बऱ्याच जिल्ह्यातील शेतकरी ई पिक पाहणी न लावलेल्या पिकाची करतात असे केल्याचे बरेच जिल्ह्यातील उदाहरणे आहेत आणि परत नुकसान भरपाईची मागणी करतात असे केल्याने त्या शेतकऱ्यावर फौजदारी गुन्हे देखील दाखल झालेले आहेत.

शेतकरी बंधूंनो बरेचशे शेतकरी ई पिक पाहणी करत नाहीत जर ई पीक पाहणी केली नसेल तर आपण शासनाला अनुदान ,नुकसान भरपाई ही मागू शकत नाहीत. कारण आपण त्या क्षेत्रावर काय लावलेले आहे ते पीक. ई पीक पाहणी न केल्यामुळे शासनास ऑनलाईन दिसत नाही. याच्यामुळे तुम्हाला तुमचे नुकसान भरपाई मिळत नाही.

ई पीक पाहणी – : पिक विमा मिळविण्याच्या नादात शेतात लावलेले पीक न दाखवता चुकीचे पीक जर दाखवले तर तुम्हाला कुठलेही प्रकारची शासनाकडून पैसा मिळण्याची खात्री नाही.

शेतकरी बंधूंनो वरील दिलेल्या सर्व माहितीच्या आधारे तुम्हाला आता समजलं असेल ई पिक पाहणीचं शासन दरबारी किती महत्त्व आहे.

सर्व शेतकरी बंधूंनी स्वतःच्या शेतात लावलेल्या पिकाचीच नोंद ई पीक पाहणी करावी, धन्यवाद

Leave a comment

error: