आयुष्मान भारत योजना व महात्मा जोतीराव फुले योजना एकत्र करण्यात आली आहे.

आयुष्यमान भारत योजना त्याला पण महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना म्हणणार आहेत. कारण आता या दोन्ही योजना एकत्र करण्यात आलेले आहेत आणि आता सर्वांना 5 लाख रुपयांचा विमा मिळणार आहे.आज रोजी शासन निर्णय म्हणजे GR प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्यासोबत “कोणकोणते उपचार होणार” आहेत उपचारांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेचे विस्तारीकरण करण्याबाबत हा 28 जुलै 2023 चा GR आहे या GR मध्ये महत्त्वाची काय काय माहिती आहे. कोण कोण पात्र राहणार आहे सगळी माहिती दिलेली आहे. आणि उपचारांची यादी सुद्धा दिलेली आहे.
आपण महत्त्वाची जी काही माहिती आहे हे तुम्हाला मी सांगतो म्हणजे तुम्हाला ही माहिती सर्व समजेल. तर तुम्ही पाहू शकता आपलं महाराष्ट्र राज्याची जी काही योजना होती. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही दोन जुलै 2012 पासून आपल्या राज्यात राबविण्यात येत आहे आणि आता आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे हे केंद्र शासनाची योजना आहेत ही योजना दिनांक 23 सप्टेंबर 2018 पासून राज्यात लागू करण्यात आलेली आहे. दिनांक 26 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयानुसार आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची सांगड घालून दोन्ही योजना राज्यात एकत्रितपणे राबवण्यास निर्णय घेतलेला आहे.

आयुष्यमान भारत योजना

> शासन निर्णय 👇
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जी आहे त्या योजनेअंतर्गत 5 लाख रुपये विमा काही जणांना दिला जातो. आता जी आपली महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आहे या योजनेअंतर्गत दीड लाखापर्यंत विमा मिळायचा आता काय होणार आहे तर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजना एकत्र करून 5 लाख रुपये विमा मिळणार आहे.

यामध्ये अजून काही चेंजेस करण्यात आले ज्यामध्ये सध्या “मूत्रपिंड शस्त्री क्रियेसाठी” महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये खर्च मर्यादा जी होती ती 2.5 लाखापर्यंत होती आता मात्र ती 4.5 लाख करण्यात आली आहे.

महत्वाचं म्हणजे सध्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना जी आहे आपल्या महाराष्ट्र शासनाची त्याच्यात 996 उपचार होते आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये 1209 उपचार होते तर आता याच्यामध्ये 181 उपचारातून का टाकण्यात आले आहेत आणि याच्यात मागणी 328 उपचारांची झालेली आहे आता 147 ने वाढ होऊन आता उपचारांची जी संख्या होणार आहे ती 1356 एवढी करण्यात आलेली आहे . काही हॉस्पिटल होते ते 1000 हॉस्पिटल होते अगोदर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये आता याच्यामध्ये 350 ने वाढ होणारे म्हणजेच टोटल आता जे काही रुग्णालय होतील हॉस्पिटल होतील ते 1350 राहणारे.

–> योजना कोणाला लागू आहे


कार्ड वगैरे लागेल का तुम्हाला लागणार नाही. पण तुम्ही पाहू शकता आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना म्हणजेच राज्यातील सर्व शिधापत्रिका धारकांना कुटुंबे व अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या कुटुंबांना लागू करण्यात येणार आहे. म्हणजे महाराष्ट्रात सर्वांना ही योजना लागू आहे. कोणतेही तुमचे शिधापत्रिका धारक असू द्या ‘केशरी’ असेल किंवा ‘पांढरे’असेल पिवळे असेल किंवा तुम्ही ‘महाराष्ट्रामध्ये राहत असाल’ तरी सुद्धा तुम्हाला ही योजना लागू आहे.

हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा म्हणजे एक्सीडेंट झाल्यानंतर जी काही प्रक्रिया असते ती 30000 एवढी खर्च मर्यादा होती आता 1 लाखापर्यंत येथे करण्यात आली आहे

–> लाभार्थी घटक 👇


लाभार्थी घटक लाभार्थी घटक मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी जे आहे ते घटक पुढीलप्रमाणे असणार आहेत.

तुम्हाला कशा पद्धतीने लाभ मिळू शकतो हे सर्व सांगितले.
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जी आहे त्यामध्ये सामाजिक आर्थिक व जातन या जनगणनेत SECC नोंदणी समस्या कुटुंबे आहेत पण तसेच अंतोदय योजनेतील कुटुंबे तसेच याशिवाय राज्य शासनाने शिफारस केल्यानुसार केंद्र शासनाचे निश्चित केलेले कुटुंबे असणार आहेत.

तुम्ही कोणत्या गटामध्ये आहे पहा

गट-अ मध्ये
जर पाहिलं तर पिवळी किंवा अन्नपूर्णा योजना आणि केशरी म्हणजे पिवळे रेशन कार्ड धारक अन्नपूर्णा योजनेमधील आणि केसरी शिधापत्रिकाधारक हे कुटुंब गट अ मध्ये आहे. तुम्हाला कोणतेही करायला लागणार नाही तुम्ही फक्त रेशन कार्ड आणि आधार कार्ड लागते.

गट ब मध्ये
शासकीय कर्मचारी निम शासकीय कर्मचारी शुभ्र शिधापत्रिकाधारक कुटुंबे हे गट ब मध्ये मोडतात. तसेच कोणत्याही शिधापत्रिका नसलेल्या पात्र असणार आहेत.

गट क मध्ये
गट अ गट ब मध्ये समाविष्ट ना होणारे शासकीय शासनमान्य आश्रम शाळेतील विद्यार्थी अनाथ आश्रमातील मुले शासनमान्य महिला आश्रमातील महिला शासनमान्य वृद्ध आश्रमातील जेष्ठ नागरिक वृद्ध हे सर्व माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकष पत्रकाच्या आधारावर अवलंबून असलेले कुटुंब सदस्य महाराष्ट्र इमारत तसेच बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी जीवित महाराष्ट्र राज्य बाहेरील रहिवासी असलेले बांधकाम कामगार तसेच त्यांचे कुटुंब हे सर्व घटकांमध्ये येतात.

गट ड मध्ये
लाभार्थ्यांच्या अ ब क या सर्व गटांमध्ये समाविष्ट नसणारी तसेच महाराष्ट्राच्या सीमालगतील रस्ते अपघातात जखमी झालेले महाराष्ट्र बाहेरील व देशाबाहेरील रुग्ण हे समाविष्ट आहेत. गड मधील आरोग्य संरक्षण यात 1 लक्ष खर्च शासन करते.

महत्त्वाची सूचना


राज्यातील काही कुटुंबे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लाभार्थी आहेत याची तपासणी केली जाते. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जे नाहीत असे लाभार्थी यांचा समावेश महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत होतो.

तुम्ही तुमचे रेशन कार्ड आधार कार्ड हे सर्व देऊन वरील सांगितलेल्या सर्व योजनेचा लाभ घेऊ शकतात.

आयुष्मान भारत योजनेबद्दल सविस्तर माहिती सांगणारी bhagirathigold.com वेबसाईट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा. धन्यवाद

Leave a comment

error: